सातवाहन राजे: महाराष्ट्राची गौरव परंपरा
सातवाहनांचे राज्य निर्माण झाले ते महाराष्ट्रात. पण चंद्रगुप्त आणि अशोक या मौर्य राजांचा इतिहास पूर्ण भारताला जेवढा माहिती आहे त्या तुलनेत सातवाहनांचा इतिहास अतिशय गढूळपणे सर्वांना माहिती आहे. सातवाहनांचा अस्त झाला तेव्हा त्यांची राजधानी महाराष्ट्राच्या पैठणवरून आन्ध्र प्रदेशात केव्हाच हलवली गेली होती. या ब्लॉग च्या माध्यमातून सातवाहनांचा वास्तव इतिहास समोर ठेवणे आणि त्याबद्दलची माहिती प्रामाणिकपणे तटस्थपणे देणे हा हेतू आहे.
हळूहळू आपण बघुयात सातवाहन राजांचा इतिहास. सुरुवात कशी झाली ? कोठे कोठे त्यांचे उल्लेख आहेत? इतिहासकारांनी त्यांना एका विशिष्ट कोंदणात बांधण्याचा प्रयत्न कसा केला ? सातवाहनांच्या दंतकथा आणि त्याबद्दलचे वास्तव ऐतिहासिक पुरावे आणि महत्वाची गोष्ट सातवाहनांचा इतिहास शोधण्यासाठी आतापर्यंत झालेली उत्खनने या सर्वांचा शोध आणि त्या अनुषंगाने तटस्थ मांडणी या ब्लॉग द्वारे करण्याचा प्रयत्न आपण करूयात.
वाचकांना विनंती: तुमच्याकडे सातवाहनांची काही माहिती असल्यास कमेंट मध्ये अवश्य द्यावी. त्याची पडताळणी करून ती माहिती सुद्धा तुमच्या नावासकट ब्लॉग वर दिली जाईल.
धन्यवाद,
Friday, March 6, 2026
सातवाहनांचा इतिहास
Subscribe to:
Post Comments (Atom)
ओळख सातवाहनांची
ओळख सातवाहनांची : या पोस्ट मध्ये आपण सातवाहन राजांची सुरुवात कधी झाली हे माहिती करून घेऊया आणि त्यांची वंशावळ बघू. म्हणजे भारताच्या इ...
No comments:
Post a Comment